सदाभाऊ साबळे हत्येप्रकरणी राजेश कैकाडेला अटक

September 13, 2012 8:48 AM0 commentsViews: 7

13 सप्टेंबर

शेकाप नेते सदाभाऊ साबळे यांच्या हत्येप्रकरणी राजेश कैकाडी याला संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. राजेश कैकाडे हा याधीच तळोजा जेलबाहेरील गोळीबारप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात होता.आता त्याला या हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे संचालक सदाभाऊ साबळे यांची काल सकाळी हत्या करण्यात आली होती. पांढर्‍या रंगाच्या गाडीमधून आलेल्या 5 अज्ञात जणांनी सदाभाऊ साबळे यांच्यावर चॉपरने वार केला. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

close