आयफोन -5 आला रे..!

September 13, 2012 10:17 AM0 commentsViews: 70

13 सप्टेंबर

स्मार्ट फोनच्या जगात आपला दबदबा निर्माण करणार्‍या ऍपलने आज आणखी एक धमाका केला. अमेरिकेतील सॅन फ्रांसिको येथे एका खास कार्यक्रमात आयफोन 5 लाँन्च करण्यात आला आहे. 7.6 मिमी इतक्या कमी जाडीचा, 4 इंचाची स्क्रीन, 112 ग्रॅम इतकं वजन, ग्लॉस आणि अल्युनियमची बॉडी असलेला आणि सर्वाधिक वेगवान असा आयफोन बाजारात दाखल करण्यात आला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून आयफोन तयार करण्यात आला आहे. आयफोन 4 पेक्षा हा फोन 20 टक्के हलका आणि 18 टक्के बारीक आहे.

विशेष म्हणजे आयफोन 5 मध्ये ऍपलने डिझाईन केलेली ए-5 ही चीप लावली आहे. त्यामुळे मागील फोन पेक्षा आयफोन सुपरफास्ट असणार आहे. यामुळे आयफोन 5 हा गेम शौकीनांसाठी खास मेजवानी असणार आहे. आयफोन 5 मध्ये 8 मेगापिक्सलचाच कॅमेरा आहे जो 4 मध्ये सुध्दा आहे. पण ऍपलचा दावा आहे की, या कॅमेर्‍याचं सेन्सर आणि साफ्टवेअर चांगली असल्यामुळे फोटो चांगले काढता येणार आहे.

बर याहीपेक्षा चांगली खुशखबर म्हणजे याची किंमत. आयफोन 5 ची किंमतही 4 इतकीच बरोबर ठेवण्यात आली आहे. 16 जीबीचा आयफोन 5 हा 199 डॉलर म्हणजे भारतीय किंमतीनुसार 11 हजार रुपये तर 32 जीबी आयफोन 299 डॉलर म्हणजे 16,500 इतकी असणार आहे आणि सर्वाधिक 64 जीबी फोन हा 399 डॉलर म्हणजे 22 हजारांना मिळणार आहे. या किंमती सध्यातरी अमेरिकेसाठी आहे. बाकी देशांमध्ये लवकरच किंमती ठरणार आहे. अमेरिकेत आयफोन 5 ची बुकिंग सप्टेेंबर 14 पासून सुरु होणार आहे तर भारतात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँन्च होण्याची शक्यता आहे.

close