कोळसा खाण प्रकरणी भाजपाने घेतली राष्ट्रपतींची भेट

September 12, 2012 8:16 AM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर

कोळसा खाण घोटाळ्यावरुन संसदेत सरकारला घेरल्यानंतर भाजपने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. हा घोटाळा उघड करणार्‍या कॅगवर सरकारने टीका केली यात आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपने केली आहे. आज लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली,सुषमा स्वराज यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. घटनात्मक संस्था असलेल्या कॅगवर आरोप करणं लोकशाहीला मारक असल्याची टीका अडवाणींनी केली. तर काँग्रेसनं पुन्हा एकदा कॅगवर आणि भाजपवर आरोप सुरूच ठेवले आहे.

close