डॉ.सुदाम मुंडेसह 17 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

September 12, 2012 10:22 AM0 commentsViews:

12 सप्टेंबर

बीड – परळी इथल्या गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडेंसह 17 जणांविरोधात परळी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात डॉ.सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवध, बेकायदा गर्भपात करणे, पुरावा नष्ट करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर व्यंकटेश मुंडेसह इतर 3 जणांविरुद्ध मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, गुन्हेगारी कटकारस्थान रचणे असे गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी 15 सप्टेंबरला परळी कोर्टात करण्यात येणार आहे.