करणजाडेचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची हत्या

September 12, 2012 7:58 AM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे संचालक आणि करणजाडे गावाचे माजी सरपंच सदाभाऊ साबळे यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. साबळे आज सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकला निघाला होते. याचवेळीचा फायदा घेत पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात पाच जणांनी सदाभाऊ साबळे यांच्यावर चॉपरने वार केला. राजकीय वादातून ही घटना घडल्याच संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.

close