लिबियात अमेरिकेच्या राजदूतांसह 4 जणांची हत्या

September 12, 2012 1:11 PM0 commentsViews: 6

12 सप्टेंबर

अमेरिकेल्या 9/11 च्या हल्ल्याला 11 वर्षं पूर्ण होत असतानाच अमेरिकेच्या दुतावासावर आणखी एक मोठा हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या लिबियातल्या दूतावासावर रॉकेटनेहल्ला करण्यात आला. यात अमेरिकेचे राजदूत ख्रिस्तोफर स्टीवन्स मृत्युमुखी पडले आहे. तर त्यांच्यासोबत त्यांचे तीन सहकारी ठार झाले आहे. पैगंबर मोहम्मद यांच्यावर आधारीत एका डॉक्युमेंटरीला विरोध म्हणून लोक रस्त्यावर उतरली. लोकांनी बेंगाजी शहरात निदर्शन करत तोडफोड करत दुतावासावर हल्लाबोल केला. या जमावात काही हल्लेखोर हे बंदूक आणि शस्त्र घेऊन सहभागी झाले होते.अमेरिकेच्या दूतावासावर या लोकांनी हॅन्डग्रेण्ड फेकली. दूतावासाच्या बाहेर सुरक्षरक्षक तैनात होती पण जमाव खूप मोठ्या संख्येनं असल्यामुळे त्यांचा निभाव टिकला नाही. लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्या मुत्यू नंतर सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे.

close