कुडनकुलम प्रकल्पात युरेनियम भरण्यास कोर्टाचा हिरवा कंदील

September 13, 2012 12:03 PM0 commentsViews: 17

13 सप्टेंबर

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात युरेनियम भरायला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पात, युरेनियम भरण्याची प्रक्रिया आता सुरू होऊ शकते. युरेनियम भरण्याच्या कामाला स्थगिती द्यावी अशी याचिका टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकिल प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. पण दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या याचिकेवरची सुनावणी 15 दिवस पुढे ढकलली. दरम्यान, प्रकल्पाविरोधात आंदोलन आणखी तीव्र केलंय.आंदोलक आता समुद्रात उतरले आहे आणि आता समुद्रातून ते आंदोलन लावून धरत आहे.

close