…तर पाठिंबा काढून घेऊ -ममता

September 15, 2012 1:47 PM0 commentsViews: 3

15 सप्टेंबर

थेट परदेशी गुंतवणुकीवरुन सध्या केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. सरकारनं डिझेल, गॅस आणि थेट परदेशी गुंतवणुकीचा निर्णय मागे घ्यावा नाहीतर, त्यांचा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला. याच्या निषेधार्थ त्यांनी आज कोलकातामध्ये रॅली काढली आहे. त्या रॅलीला संबोधित करताना त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली.

यूपीए सरकार हे आम आदमीचं राहिलेलं नाही, जे काही चाललंय हे न समजण्याइतके आम्ही मुर्ख नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी सरकारला सुनावलं. रिटेल क्षेत्रात आम्ही थेट परदेशी गुंतवणूक येऊ देणार नाही, तसा उल्लेखही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्याला जागणार आहोत. तुम्हाला आमची गरज आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही ममतादीदींनी दिला.

तर दुसरीकडे मायावतींनीही या दरवाढीला विरोध केला. सध्या केंद्र सरकारला सपा आणि बसपानं बाहेरुन पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने गेल्या 48 तासांतले सर्व निर्णय मागे नाही घेतले, तर हा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा या दोन्ही पक्षांनी दिला. त्यामुळे सरकारसमोरच्या समस्या या वाढत चालल्यात…

सरकार संकटातबहुमतासाठी आवश्यक – 272यूपीए (तृणमूलसोबत) – 273यूपीए (तृणमूलशिवाय) – 254

बाहेरचा पाठिंबाही धोक्यात समाजवादी पार्टी 22बहुजन समाज पार्टी 21राष्ट्रीय जनता दल 4जनता दल (सेक्युलर) 3इतर पक्षांचाही विरोधमाकप + भाकप 20बीजू जनता दल 14अण्णा द्रमुक 9तेलुगू देसम 6इतर 17

close