ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका

September 12, 2012 1:41 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठे यांना आज अटक करून लगेच सुटका करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज त्यांना अटक करून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याची तक्रार ह मो मराठे यांच्याविरोधात करण्यात आली होती. मराठे यांनी एका पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला. सोमवारी मराठे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत जेम्स लेनच्या पात्राचा उल्लेख मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मराठे यांची दिलगिरी पुरेशी नाही असं संभाजी ब्रिगेडने स्पष्ट करत विरोध कायम ठेवला. आज ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका झाल्यामुळे साहित्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

close