विराटच ‘वन डे क्रिकेटर ऑफ द इअर’

September 15, 2012 3:17 PM0 commentsViews: 4

15 सप्टेंबर

भारताच्या 'विराट' विजयाला हातभार लावणारा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला आयसीसी पुरस्कारांमध्ये वन डे क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आलंय. या पुरस्कारालाठी सर्वात जास्त चुरस होती. कारण या विभागात दोन भारतीय आणि दोन लंकन प्लेअर्समध्ये अटीतटीचा मुकाबला होता. विराट कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या आणि तुफान फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेट जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

या हंगामात 31 मॅचमध्ये 66.65 च्या ऍव्हरेजनं 1733 रन्स ठोकत 23 वर्षाच्या विराट कोहलीनं वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅट्समनसाठी आपला दावा ठोकला. 8 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरीच्या जोरावर तर त्यानं आपण एकहाती मॅच फिरवू शकतो हेही सिद्ध करुन दाखवलंय. जवळपास सर्व देशांविरुद्ध कोहलीने धडाकेबाज कामगिरी केली. पण लंकेविरुद्ध त्याची कामगिरी खर्‍या अर्थानं बहरलीे. होबार्टमध्ये केलेली दणदणीत सेंच्युरी आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. या पुरस्कारासाठी कोहलीच प्रबळ दावेदार मानला जात होता.

close