धान्याच्या 9 हजार पोतींमध्ये खत आणि कचरा

September 13, 2012 2:07 PM0 commentsViews: 7

13 सप्टेंबर

औरंगाबादमध्ये एफसीआयच्या गोदामातल्या धान्याच्या 9 हजार 40 पोतींमध्ये खत आणि कचरा आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातला गव्हाचा पुरवठा बंद करण्यात आला. जिल्ह्यात पुरवल्या जाणार्‍या गव्हात खत आणि कचरा असल्याची तक्रार होती. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि अन्न-औषध प्रशासनानं एफसीआयच्या गोदामांवर छापा टाकला. त्यावेळी 3 गोदामांमध्ये 9 हजार 40 पोतींमध्ये असा प्रकार दिसून आल्यानं विक्री थांबवण्यात आली आहे.

close