प्रमुख शहरात एनएसजी युनिट उभारणार – पंतप्रधान

November 30, 2008 4:19 PM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर, नवी दिल्लीदहशतवादाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यावं, असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलंय. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीतही राजकीय पक्षांचे मतभेद पुढे आले. शिवसेनेतर्फे कुणीही या बैठकीत उपस्थित नव्हते. भाजपाध्यक्ष राजनाथसिंग आणि लालकृष्ण अडवाणीही प्रचार सभांमुळे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे दहशतवादासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर राजकीय पक्ष अजूनही एकत्र येत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत पंतप्रधानांनी देशातल्या चार प्रमुख शहरात एनएसजी युनिट उभारणार असल्याचं सांगितलं. तसंच एफबीआयच्या धर्तीवर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापन करण्याबाबत विचार सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

close