घोटाळे रोखले असते देशावरही वेळ आली नसती -अण्णा हजारे

September 15, 2012 4:07 PM0 commentsViews: 8

15 सप्टेंबर

सरकारने घेतलेल्या एफडीआयच्या मुद्द्यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधील काही नेत्यांवर विदेशी संस्कार आहेत यामध्ये जनतेचे आणि देशाचे काही देणेघेणे नाही. एफडीआय हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. एफडीआयमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार नाही उलट देशाचे शोषण होईल अशी जोरदार टीका अण्णा हजारेंनी केली आहे. त्याचबरोबर घोटाळे रोखले असते तर देशावर ही वेळ आलीच नसती असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

close