मॉल-मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंगसाठी पोलिसांची मागणी

September 12, 2012 3:31 PM0 commentsViews: 13

12 सप्टेंबर

पुण्यातल्या मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंग उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पुणे वाहतूक पोलिसांनी केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला पाठवला आहे. मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये आकारल्या जाणार्‍या पार्किंगच्या अवाजवी पैशांमुळे अनेक लोक तिथे पार्किंग उपलब्ध असतानाही रस्त्याच्या कडेला वाहनं पार्क करतात. त्याचा ताण वाहतुकीवर येतो. त्यातच आकारल्या जाणार्‍या पार्किंगच्या पैशांवर मल्टिप्लेक्स आणि मॉल करही भरत नाहीत. त्यामुळे एफएसआयचा फायदा घेतला गेलेला असेल तर तिथे पार्किंग मोफत उपलब्ध करुन देण्यात यावं अशी मागणी वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेली आहे. महापालिकेकडुन मात्र अजुनही या प्रस्तावावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

close