पर्यटन मंत्र्यांच्या भावाच्या कोळसा खाणींचे परवाने रद्द

September 15, 2012 4:18 PM0 commentsViews: 3

15 सप्टेंबर

एसकेएस इस्पात या कंपनीच्या नावावर असलेल्या दोन कोळसा खाणींचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कंपनी केंद्रीय पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांच्या भावाची आहे. काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील आणि पॉवर कंपनीला दिलेल्या कोळसा खाण परवानगीबाबत मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत यात कुठलीही चर्चा झाली नाही. आता या मंत्रिगटाची पुढची बैठक सोमवारी होणार आहे.

close