पुजा जाधव खून प्रकरण एकाला अटक

September 12, 2012 1:33 PM0 commentsViews: 68

12 सप्टेंबर

पुण्यात एआरडीई परिसरात राहणार्‍या पूजा जाधव या अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी आज आकाश कोळी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचनं दिली. पूजा पाषाणमधल्या इंग्रजी शाळेत दहावीत शिकत होती. शनिवारी ती ट्यूशनसाठी घराबाहेर पडली. पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या वडिलांनी शोधाशोध केली आणि अखेर चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण रविवारी दुपारी घरापासून जवळच तिचा मृतदेह सापडला होता.

close