डेक्कन चार्जर्स नव्या मालकाच्या शोधात

September 13, 2012 4:41 PM0 commentsViews: 6

13 सप्टेंबर

आयपीएलमधल्या डेक्कन चार्जर्स टीम नव्या मालकाच्या शोधात आहे. आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आधीचे मालक डेक्कन क्रोनीकलकडून फ्रँचाईजी काढून घेण्यात आली आहे आणि यानंतर बीसीसीआयनं टीमसाठी टेंडर काढलं. पण केवळ एकच टेंडर बीसीसीआयकडे आलं आहे. आंध्रप्रदेश स्थित पीव्हीपी फिल्म्स डेक्कन चार्जर्स टीम विकत घेण्यासाठी उत्सुक होती. यासाठी त्यांनी 855 ते 915 कोटी रुपायांचं टेंडर दिलं. पण त्यांचं हे टेंडर रद्द करण्यात आलं. याआधी बँकांनी टीमसाठी जे लोन दिलंय ते अजूनही वसूल झालेलं नाही. या कारणावरुनच पीव्हीपीचं टेंडर रद्द करण्यात आलं आहे.

close