6 ऐवजी 10 सिलेंडर मिळणार ?

September 17, 2012 9:01 AM0 commentsViews: 12

17 सप्टेंबर

मागील आठवड्यात डिझेलच्या दरात वाढ आणि घरगुती गॅस सिलेंडरवर मर्यादा घालण्यात आल्यामुळे सरकारवर विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. अगोदरच महागाईच्या खाई होरपळणार्‍या जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. जनतेच्या आणि विरोधकांच्या विरोधामुळे सरकारने आता एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एलपीजीच्या सहा सिलेंडरऐवजी आता 10 सिलेंडरवर सबसिडी देण्याचा विचार सरकारकरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एफडीआयला परवानगी, डिझेल दरवाढ आणि एलपीजीच्या सबसिडीवर मर्यादा घालण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर यूपीएच्या घटकपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर सरकार आता एलपीजी बाबतचा आपला निर्णय अंशत: बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

close