ममतादीदींचा सरकारला अल्टीमेटम

September 15, 2012 9:58 AM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर

डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांची दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा रोष सरकारनं ओढावून घेतला होता. तर काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं 3 महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेऊन विरोधक आणि मित्र पक्षांचाही रोष ओढावून घेतला. पुढच्या 72 तासात डिझेल दरवाढ मागे घ्या आणि जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला. डिझेल दरवाढ मागे घ्यावी या आपल्या भूमिकेवर ममता ठाम आहेत. तर ममतांपाठोपाठ मायावतींनीही या दरवाढीला विरोध केला आहे. सध्या केंद्रात बसपानं सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यामुळे जर ही दरवाढ मागे घेतली गेली नाही तर हा पाठिंबा काढून घेण्याचा विचार मायावती करु शकतात असं समजतंय. तर दुसरीकडे याच मुद्यावरुन मुलायम सिंगांची समाजवादी पार्टीही नाराज आहे. त्यामुळे सरकारसमोरच्या समस्या या वाढत चालल्या आहे.

close