त्रिवेदीवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांची होणार चौकशी

September 15, 2012 10:13 AM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे पोलीस अधिकारी आणि सल्ला देण्यार्‍या वकिलांची चौकशी होणार आहे. त्यांच्या चौकशीचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आदेश दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेत. असीम त्रिवेदी अटक प्रकरणी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आर आर पाटलांना टोला लगावला होता. तर मुंबई हायकोर्टानंही पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलायचं समजतंय. असीम त्रिवेदीला 12 सप्टेंबरला जामिनावर सुटका झाली आहे.

close