पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी कायम, राणे प्रदेशअध्यक्षापदी ?

September 17, 2012 9:16 AM0 commentsViews: 2

17 सप्टेंबर

राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराला नवं वळण लागलंय. सध्या तरी नेतृत्व बदल करण्याचा काँग्रेस श्रेष्ठींचा इरादा नाही हे स्पष्ट झालंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असं दिसतंय. पण मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सांगणार्‍या नारायण राणेंना मात्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती मिळत आहे. अलिकडेच नारायण राणेंनी सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींनी नारायण राणेंना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिल्याचं समजतंय. राणे यांना मुख्यमंत्रीपद देण्यास राहुल गांधी यांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे राणेंची बोळवण प्रदेशाध्यक्षपदावर केली जात आहे.

close