गणेशोत्सवासाठी 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त

September 18, 2012 5:11 PM0 commentsViews: 7

सुधाकर काश्यप, मुंबई

18 सप्टेंबर

गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होतेय. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून शहरात मोठा बंदोबस्त असणार आहे. सुमारे 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.गणेशोत्सवाची धामधूम शिगेला पोहोचलीय. अनेक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेत. गणेश मंडळांचे गणपती पाहण्यासाठी रोज लाखो भाविक रस्त्यावर जमतात. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी केली. सर्व मंडळांना सोबत बैठका झाल्यात त्यांना काय त्या सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त जनसंपर्कचे निस्सार तांबोळी यांनी दिली. मुंबई पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा सोबत केंद्रीय दलाचाही बंदोबस्त असणार आहे.

कडेकोट सुरक्षा19 हजार पोलीस 1, 000 रिक्रुट पोलीस एसआरपीच्या 4 तुकड्या 2,000 होमगार्ड 500 महिला होमगार्ड 500 नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक एल ए चे 4 हजार पोलीस एवढ्या मोठया संख्येनं हा पोलीस बंदोबस्त असेल. मुंबईमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेर बसवण्यात आले आहेत. गणएशोत्साच्या काळात सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलंय.

close