सलाम शहीद अधिका-यांना

November 29, 2008 3:53 PM0 commentsViews: 47

30 नोव्हेंबर, मुंबईवसुंधरा काशीकर एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याप्रमाणंच सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर विजय साळसकर आणि अ‍ॅडिशनल सीपी अशोक कामटे हे जिगरबाज अधिकारीही देशासाठी शहीद झाले.आपल्या वीरमरणानं हे अधिकारी अमर झाले आहेत. पण त्यांची उणीव मात्र सतत जाणवत राहणार आहे.आपल्या जिवंतपणी आपल्या मुलाला अग्नी देण्याची वेळ आपल्यावर येईल अशी कल्पना स्वप्नातसुद्धा अशोक कामटेंच्या वडिलांनी केली नसेल. त्यांच्या चेहर्‍यावरचे सर्वस्व गमावल्याचे भाव…एक हरवलेपण…आणि पराकोटीची अगतिकता न सांगताही त्यांचं दु:ख बोलत होती. विजय साळसकरांच्या कुटुंबियांचीही काही वेगळी भावना नव्हती. त्यांच्या पत्नीला आणि मुलीला त्यांचा मृतदेह आणला तेव्हा शोक आवरत नव्हता. बॉम्बस्फोटाचा निषेध नेहमीप्रमाणे आपल्या राजकीय नेत्यांनी अत्यंत तीव्र शब्दात केला. यानंतर स्फोटाची चौकशी होईल, समित्या नेमल्या जातील साळसकर आणि कामटे कुटुंबीयांचं दु:खाचं काय? आपलं भविष्य पणाला लावून हे पोलीस, हे लष्करी अधिकारी लढत असतात म्हणून आपण आपला आज, आपला वर्तमान सुखानं जगू शकतो. या बदल्यात आपल्याला काय मिळणार याचा विचारही कधी ते करत नाही…लोग अमृत जाँचकर पीते जहाँ ,हमने जहर बीना पूछे पिया..क्या मिला हमने कभी सोचा नही हीच भावना शेवटच्या क्षणी कामटे, करकरे आणि साळसकराची असेल.

close