मुंबईत मनीष मार्केटजवळ भीषण आग

September 17, 2012 12:43 PM0 commentsViews: 7

17 सप्टेंबर

दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटजवळ आज संध्याकाळी पाचच्या सुमारास बेस्टच्या सबस्टेशनवरच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या तात्काळ रवाना झाल्यात. तब्बल तीन तास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. मनीष मार्केटमध्ये यापूर्वी नोव्हेंबर 2011 मध्ये भीषण आग लागली होती. या आगीत मार्केटची 4 मजली खाक झाली होती. गणेशोत्सावाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली असताना अचानक लागलेल्या आगीमुळे एकच धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताचा अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात पण अरुंद रस्ते,वर्दळीमुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला होता. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ही आग शॉर्टसक्रीटमुळे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

close