बोगस शस्त्र आढळल्यास एजन्सीचे परवाने रद्द होणार

September 15, 2012 12:47 PM0 commentsViews: 4

15 सप्टेंबर

खासगी सुरक्षा एजन्सींवर अखेरीस सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. बोगस शस्त्र परवाना असणार्‍यांविरोधात कारवाईचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी आदेश दिले आहे. बोगस शस्त्र परवाने आढळल्यास एजन्सीचे परवाने रद्द होणार असंही गृहमंत्री आर आर पाटील स्पष्ट केलं. मुंबईत कुर्ला इथं बेकायदा शस्त्रास्त्र आणि खोटे शस्त्र परवाने सापडली होती या प्रकरणाचा भांडाफोड आयबीएन लोकमतने केला होता. 11 सप्टेंबरच्या रात्री भरत चंद्रमा सिंग हा बिहाराचा राहणारा तरुण मंगळवारी संध्याकळी शस्त्रासह उतरला होता. त्यानं दिलेल्या माहितीवरून मुंबईतल्या इतर ठिकाणांवरून आणखी 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.कुर्ला रेल्वे पोलिसांनी भरतची चौकशी केली असता त्यानुसार मुंबईतल्या सिक्युरीटी एजन्सींना आणि तेथील सुरक्षारक्षकांना रायफल पुरवून बनावट लायन्सस देत होता अशी माहिती या इसमानं रेल्वे पोलिसांना दिली.

close