केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे ?

September 15, 2012 12:57 PM0 commentsViews: 18

15 सप्टेंबर

2014 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी निवडणुकीचे रणशिंग फुकल्यानंतर काँग्रेसनेही आता कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी, पी चिदंबरम, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कृष्णा यांच्या खात्यांत बद्दल होणार नाही. तर या मंत्रिमंडळात राहुल गांधींचा समावेश होणार नाही. पण तरूण मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. अभिनेता चिरंजिवी आणि तारीक अन्वर यांचा मंत्रिमंडळात समावेशाची शक्य आहे.

close