काँग्रेसची ‘सेटिंग’साठी धावपळ

September 19, 2012 10:35 AM0 commentsViews: 5

19 सप्टेंबर

यूपीए सरकार अल्पमतात आल्याने दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि तृणमूलमध्ये समेटाची शक्यता मावळली आहे. काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत एफडीआयचा निर्णय मागे घ्यायला स्पष्ट नकार देण्यात आलाय. तृणमूलने पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे आता सपा, बसपाची मदत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डिझेलची किंमत अंशतः कमी होऊ शकते. सपा, बसपाचा पाठिंबा मिळवण्याची राजकीय खेळी काँग्रेस खेळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिकडे भाजपही आक्रमक झाली आहे. एफडीआयच्या मुद्द्यावर संसदेच्या अधिवेशनाची मागणी त्यांनी केली.

close