पाकिस्तानची भारतावर 5 विकेटनं मात

September 17, 2012 1:27 PM0 commentsViews: 3

17 सप्टेंबर

टी-20 वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण त्याआधीच भारतीय टीमच्या मिशन टी-20 वर्ल्ड कपला मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यामध्ये चांगल्या स्कोरनंतरही भारताला पाकिस्तानविरुध्द पराभव पत्करावा लागला. कामरान अकमलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताचा 5 विकेटनं पराभव केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय फास्ट बॉलर्सनं केलेली खराब बॉलिंग भारताच्या पराभवाचं कारण ठरली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 186 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहली आणि रोहित शर्माने फटकेबाजी करत भारताला मोठा स्कोर उभा करुन दिला. कोहलीनं 75 रन्स केले. याला उत्तर देताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकचे 4 बॅट्समन 84 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर कामरान अकमल आणि शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अकमलनं 6 सिक्स आणि 5 फोर मारत नॉटआऊट 92 रन्स केले.

close