सलाम माणुसकीला…

November 30, 2008 3:40 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर, मुंबईप्रीती खान एकीकडे दहशतवादी सामान्य माणसांना हकनाक संपवत होते तर दुसरीकडे अतिरेकी हल्ल्यांच्या त्या तीन दिवसांत अनलिमिटेड माणुसकीचंही दर्शन घडत होतं. म्हणूनच की काय अशा दहशतवादाचा नेहमीच पराभव होत आला आहे. यावेळीही तो झालाच आहे. अतिरेकी हल्ल्यांनंतर जीटी, कामा, सेण्ट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तोबा गर्दी होती. आपल्या नातेवाईकांचे आणि मित्रांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ही गर्दी जमली होती. मानखुर्दचा पप्पू तमर बहादूरसिंग जीटी हॉस्पिटलमध्ये आपल्या मित्राचा मृतदेह नेण्यासाठी आला होता. "हमने हमारे दोस्त को बचाने की बहोत कोशिश की है, लेकीन बचा नही सका, " असं खिन्नपणे तो म्हणाला. मृत्यू मग तो कधीही आणि कसाही असो मागे राहिलेल्यांना त्याचे यथासांग सोपस्कार तर करावेच लागतात. पण सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊनही पपूला त्याच्या मित्राच्या मृतदेहाचा ताबा मिळत नसल्यामुळे तो वैतागला होता. " कब से परेशान है एक डेड बॉडी लेनेके लिये…यहाँ जाव वहाँ जाव… मैं तो परेशान हो गया हूँ…" पप्पूची मन:स्थिती समजत होती. पण ती वेळच अशी होती की काही करता येत नव्हतं. एकीकडे ही परिस्थिती होती तर दुसरीकडे मात्र दीपक कवळे अहोरात्र राबत होते. सीएसटी टू सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि कामा टू जीटी हॉस्पिटल अशी सतत मृतदेहांची नेआण करत होते. ते ही कुठल्या मोबदल्याशिवाय. " जसा कॉल येईल तसं काम करत आहे. कारण गरजच तशी भासत आहे, " अ‍ॅम्ब्युलन्सचालक दीपक कवळे सांगत होते. कुलाबा-सीएसटी परिसरात दहशतवाद्यांचा नायनाट करण्याच्या कामासाठी भारतीय लष्कराचा फौजफाटा आला होता. त्यांच्या खाऊची सोय या परिसरातल्या लोक करत होते. तर ज्या इमारती लष्कराने खाली केल्या होत्या त्या इमारतीतल्या लोकांना परिसरातल्या लोकांनी आसरा दिला होता. या सगळ्यांचं काम पाहून माणुसकी माणुसकी म्हणतात, ती याहून निराळी असते का? हा प्रश्न पडल्यावाचून राहिलं नाही.

close