सिंधुदुर्गात सापडलेल्या पिशव्यांमध्ये चरस

September 15, 2012 1:26 PM0 commentsViews: 6

15 सप्टेंबर

सिंधुदुर्गच्या देवगड , मालवण आणि वेंगूर्लेच्या समुद्र किनार्‍यावर आठ दिवसांपुर्वी सापडलेल्या पिशव्यांमध्ये चरस असल्याचं उघड झालं आहे. तब्बल 1 किलो वजनाच्या 69 पिशव्यांमध्ये चरस असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सर्व पिशव्यांवर पाकिस्तान राईस लेबल लावलेलं आहे. पोलिसांनी 69 तर पिशव्या ताब्यात घेतल्या असून बाजारात याची किंमत कोट्यावधींच्या घरात असल्याचा सांगण्यात येत आहे. समुद्रकिनार्‍यावर अचानक पाकिस्तानाचे लेबल असलेल्या पिशव्या सापडल्यामुळे यात स्फोटक असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटक नसल्याचा खुलासा केला. या पिशव्यांमध्ये पांढरे पावडर असल्याचे उघड झाले. पण या पिशव्यांवर पाकचे लेबल असल्यामुळे शंका-कुशंका वाढत गेल्या. या पावडरचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अखेर हे पांढरे पावडर चरस असल्याचं निष्पन्न झालंय.

close