काँग्रेस एफडीआयवर ठाम, ममता निर्णयावर ठाम

September 19, 2012 1:11 PM0 commentsViews:

19 सप्टेंबर

ममता बॅनर्जी यांना पाठिंबा काढल्यानंतर यूपीए सरकार अल्पमतात आले आहे. आज दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि तृणमूलमध्ये समेटाची शक्यता मावळली आहे. काँग्रेसकडून ममतांची समजूत काढण्यासाठी फोन करण्यात आल्याचं पी.चिदंबरम यांनी सांगितलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून आपल्याशी कुणीही संपर्क साधला नाही, असं स्पष्ट केलंय. तिकडे काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत एफडीआयचा निर्णय मागे घ्यायला स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता सपा, बसपाची मदत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डिझेलची किंमत अंशतः कमी होऊ शकते. सपा, बसपाचा पाठिंबा मिळवण्याची राजकीय खेळी काँग्रेस खेळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिकडे भाजपही आक्रमक झाली आहे. एफडीआयच्या मुद्द्यावर संसदेच्या अधिवेशनाची मागणी त्यांनी केली.

close