डोळ्यात मिरचीपूड टाकून 26 लाख रुपये लुटले

September 17, 2012 11:54 AM0 commentsViews: 4

17 सप्टेंबर

पुण्यामध्ये भरदुपारी चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून तब्बल 26 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रमिक भवन महापालिका बसडेपोजवळ ही घटना घडली. टू व्हीलरवरून आलेल्या अज्ञात लोकांनी संजय मोरेंच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ते घेऊन जात असलेलेल 26 लाख रुपये लुटले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close