कसाबचं राष्ट्रपतींना साकडं

September 18, 2012 11:03 AM0 commentsViews: 11

18 सप्टेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबनं आता फाशीची शिक्षा टाळण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. सुप्रीम कोर्टानं नुकतंच हायकोर्टाच्या फाशीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता कसाबनं राष्ट्रपतींना साकडं घातलंय. आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांनी कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.

मोहम्मद अजमल आमीर कसाब आता फासावर जाणार.. यावर शिक्कामोर्तब झालंय. 26 नोव्हेंबरच्या दिवशी मुंबई सीएसटीमध्ये निष्पापांवर बेछूट गोळीबार करणार्‍या या पाकिस्तानी अतिरेक्याला भारतातल्या सर्वोच्च न्यायालयानेही दोषी ठरवलंय. कसाबला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली, असा निर्वाळाही कोर्टाने दिला. खून, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणे हे गुन्हे कसाबविरुद्ध सिद्ध झालेत. 'कसाबचा पहिला आणि महत्त्वाचा गुन्हा म्हणजे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे. ज्या प्रमाणात प्राणहानी झाली, संपत्तीचं नुकसान झालं आणि दहशत पसरली, त्यावरून हा खटला दुर्मिळातला दुर्मिळच आहे. किंबहुना या प्रजासत्ताकाच्या जन्मापासून या सर्वोच्च न्यायालयाने असा खटला पाहिला नव्हता. त्यामुळे कसाबला फाशी देण्यावाचून आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.' असं कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं.अजमल आमिर कसाब याला पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आली.

गुन्हा क्र. 1भारताविरोधात युद्ध पुकारणं(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 2बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरेकी कारवाईप्रकरणी दोषी (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 3हल्ल्याचा कट आखणे (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 4पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकारम ओंबाळे, अमरसिंह सोळंकींसह 7 जणांची हत्या करणे(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 5159 जणांच्या हत्येसाठी चिथावणी देणे (शिक्षा-फाशी)कसाबसमोरचे पर्यायराष्ट्रपतींकडे दयेची याचिका सादर करण्याचा कसाबला अधिकारसध्या राष्ट्रपतींकडे 20 याचिका प्रलंबितनियमानुसार सर्व प्रलंबित याचिका मार्गी लागल्याशिवाय कसाबच्या याचिकेवर विचार होऊ शकत नाहीपण एखादी विशिष्ट याचिका सुनावणीसाठी आधी घेण्याचा राष्ट्रपतींना अधिकारसंसद हल्ल्यातला अतिरेकी अफजल गुरूची वादग्रस्त याचिका प्रलंबित

सुप्रीम कोर्टानंही अखेर कसाबला फाशी दिली. कसाबचा हा खटला रेकॉर्ड वेळेत पूर्ण झालाय. पाहूया या खटल्याचा घटनाक्रम…

26 नोव्हें. 2008 – कसाब आणि इतर 9 अतिरेक्यांचा मंुबईवर हल्ला27 नोव्हें. 2008 – अजमल कसाब सापडला6 मे 2009 – आरोपपत्र दाखल23 जून 2009 – हाफीज सईद, झकी-उर-रहमान लख्वीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट 3 मे 2010 – विशेष कोर्टात कसाब दोषी, सबाऊद्दीन आ णि फहीम अन्सारी निर्दोष6 मे 2010 – विशेष कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा सुनावली18 ऑक्टो. 2010 – मुंबई हायकोर्टात खटला सुरू, कसाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर21 फेब्रु. 2011 – कसाबच्या फाशीची शिक्षा हायकोर्टात कायम, सबाऊद्दीन आणि फहीम अन्सारी निर्दोष29 ऑगस्ट 2012 – कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालं.

close