एनडीएच्या भारत बंदमध्ये पुणे भाजपचा सहभाग नसणार

September 19, 2012 3:37 PM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर

एफडीआय आणि दरवाढीला विरोध करण्यासाठी एनडीएने गुरूवारी भारत बंद पुकारला आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं सामज्यंस्याची भूमिका सर्वच पक्षांनी बंदला फक्त नैतिक पाठिंबा दिला आहे. पुण्यातील भाजपनेच आता बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विकास मठकरी यांनी स्पष्ट केलं. या अगोदर एनडीएतील घटक पक्ष शिवसेनेनंही बंदमध्ये सहभाग होणार नसल्याचं स्पष्ट करुन टाकलं होतं. त्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास स्टाईलला मुरड घालत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबई आणि राज्यात बंदचा फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे.

close