ममता बॅनर्जी सरकारमधून बाहेर पडणार ?

September 18, 2012 11:14 AM0 commentsViews: 84

18 सप्टेंबर

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सरकारच्या बाहेर पडून ममता यूपीएला बाहेरून पाठिंबा देतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. डिझेल दरवाढ आणि एलपीजीची मर्यादा मागे घेण्यासाठी ममतांनी दिलेली 72 तासांची डेडलाईन आज संपली. आज संध्याकाळी तृणमूल काँग्रेसची बैठक आहेत. त्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल. पण काँग्रेसनंही आता ममतांची समजूत काढायची नाही, असा निर्धार केल्याचं समजतंय.

दरम्यान सरकारमधूनच LPG सिलिंडर्सच्या मर्यादेवर टीका होतेय. राज्यमंत्री हरीश रावत यांनी सबसिडीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के व्ही थॉमस यांनीही पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून हे धोरण बदलण्याची मागणी केलीय. सहापेक्षा जास्त सिलेंडरसाठी प्रत्येकी 50 रुपये जादा आणि 12 हून जास्त सिलेंडरसाठी प्रत्येकी 150 रुपये जादा आकारावे, असा नवा फॉर्म्युला थॉमस यांनी मांडला.

close