महाराष्ट्र वगळता युपी,बंगालमध्ये ‘भारत बंद’

September 20, 2012 8:48 AM0 commentsViews: 12

20 सप्टेंबरडिझेलच्या किंमतीत दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाविरुद्ध एनडीएनं पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. उत्तरप्रदेश,पश्चिम बंगालमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज सपा,बसपा,तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंद पाळण्यासाठी हाक दिली. सपाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी जंतरमंतरवर दरवाढी निषेधार्थ आंदोलन केलं. या बंदमध्ये डावे आणि भाजप एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रात मुंबई,पुणेसह बंद पाळण्यात आला नाही. शिवसेना आणि मनसे तसेच पुणे भाजपने या अगोदरच बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.बंगळुरूमध्ये कडकडीत बंदबंगळुरूमध्ये सरकारी शाळा, खासगी शाळा, हॉटेल्स बंद आहेत. कर्नाटक सरकार आणि बंगळुरू परिवहनच्या बसेस बंद आहेत. पण रिक्षा सुरू असल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सुरक्षेसाठी पोलिसांसोबतच केंद्रीय निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहे. राजीव गांधी आरोग्यविज्ञान विद्यापीठानं उद्याच्या परीक्षा पुढं ढकलल्या आहेत. अमृतसरमध्ये भाजपची निदर्शनअमृतसरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवज्योतसिंग सिधू यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली. एलपीजीच्या बाबतीत काँग्रेसचं सरकार भाजपशासित राज्यांशी भेदभाव करत असल्याचा आरोप सिधू यांनी केला. भाजपनं यावेळी सिंलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. महाराष्ट्रात मुंबई,पुणे वगळता नागपूर,औरंगाबादेत कडकडीत बंदमहाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत या बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी नागपूर, औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. नागपूरमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला आहे. औरंगाबादमध्येही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात येतोय. शिवसेना आणि मनसेनं बंदला विरोध केला आहे. पुण्यात भाजपनेही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दीड दिवसांच्या गणरायांना निरोप दिला जात आहे. त्यामुळे सेना,मनसेनं लोकभावना लक्षात घेत बंदला विरोध केला.गोपीनाथ मुंडेंचा मंत्रालयावर मोर्चामुंबईत बंद नसला तरी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी गोपीनाथ मुंडे, जयंतीबेन मेहता, विनोद तावडे आणि राज पुरोहीत यांना ताब्यात घेतलंय. त्यांना आझाद नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. एपीएमसी मार्केट बंदएफडीआय विरोधात देशभरात भारत बंदची हाक दिल्याने याचा परिणाम आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणार्‍या नवीमुंबईतील एपीएमएपीएमसी मार्केटमध्ये दिसून आले. या बंदमध्ये APMC मधील सर्व व्यापार्‍यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केट बंद असल्याने मुंबई, नवीमुंबई ला मोठा फटका जाणवणार आहे. ऐन गणेशोत्सव आणि गौरी पुजनाच्या काळात भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये भारत बंदची फज्जानाशिकमध्ये आजच्या भारत बंद अजिबात पाठिंबा मिळाला नाही. भाजप आणि माकपची निदर्शनं दिखाऊच ठरली. दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवा अशी काकुळतीची विनंती भाजपला करायला लावली पण त्यांची पाठ वळताच दुकाने पुन्हा उघडली.

close