केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

September 18, 2012 11:19 AM0 commentsViews: 4

18 सप्टेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. खासदार विलास मुत्तेमवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यात आहे. तर सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचं खाते बदलण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील – चाकुरकर यांचेही मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महाराष्ट्राला आणखी एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री असलेल्या अगाथा संगमा यांना राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकतं.

close