वर्षाला 18 सिलेंडर द्या, श्रीमंतांना सबसिडी नको -राष्ट्रवादी

September 20, 2012 10:46 AM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसनंही एलपीजीची मर्यादा आणि डिझेलची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. लक्झरी गाड्यांसाठीच्या डिझेलला सबसिडी देऊ नये आणि यातून जमणार्‍या पैशातून डिझेलवर सबसिडी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. केंद्र सरकारनं वर्षाला 9 सिलेंडर देण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीला न विचारता घेतला होता असंही राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रात एकत्र कुटुंबपद्धती आहे. एकत्र कुटुंबासाठी वर्षाला 18 सिलेंडर द्यावे तर छोट्या कुटुंबाला 12 सिलेंडर द्यावे अशी मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे. श्रीमंतांना सबसिडीतले सिलिंडर द्यायला मात्र राष्ट्रवादीनं विरोध केला आहे.

close