दुष्काळ निर्मूलनासाठी आ. विजय शिवतरेंचं उपोषण

September 18, 2012 1:37 PM0 commentsViews: 12

18 सप्टेंबर

पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळ निर्मूलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांनी सासवडमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. दुष्काळ निर्मुलनासाठी 223 कोटी रुपयांच्या पुरंदर कृषी संजीवनी योजनेला सरकारने ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बेमुदत सत्याग्रह आंदोलनामध्ये पुरंदरमधील हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पुरंदरच्या वीर धरणात गुंजवणी धरणातून येणारं हक्काचं 2 टीएमसी पाणी हे पुरंदरच्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना मिळायला हवं अशीही त्यांची मागणी आहे.

close