दुष्काळ निर्मूलनासाठी आ.विजय शिवतरेंचं उपोषण सुरूच

September 22, 2012 10:41 AM0 commentsViews: 69

22 सप्टेंबर

पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळ निर्मूलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांचं सासवडमध्ये पालखीतळ इथं आमरण उपोषण सुरू आहे. 17 सप्टेंबरपासून ते उपोषणाला बसले आहे. दुष्काळ निर्मुलनासाठी 223 कोटी रुपयांच्या पुरंदर कृषी संजीवनी योजनेला सरकारने ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बेमुदत सत्याग्रह आंदोलनामध्ये पुरंदरमधले हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे. पुरंदरच्या वीर धरणात गुंजवणी धरणातून येणारं हक्काचं 2 टीएमसी पाणी हे पुरंदरच्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना मिळायला हवं अशीही त्यांची मागणी आहे. दरम्यान, गुंजवणी धरणातल्या पाण्यासाठी आज कडकडीत पुरंदर तालुका बंद पाळण्यात आला आहे. तालुक्यातली सर्व दुकानं गणेशोत्सवातही दुष्काळाच्या मुद्द्यावर बंद आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही शिवतारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

close