अशीही ‘दादा’गिरी, मुख्यमंत्र्यांच्या सुचना डावलून हॉस्पिटलचं उद्घाटन

September 21, 2012 4:17 PM0 commentsViews: 2

21 सप्टेंबर

औरंगाबादमधील कँन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे. राज्यातील पहिल्या कँन्सर हॉस्पिटलचं काम अर्धवट असल्यानं उद्घाटन करु नये अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची असतानाही मुख्यमंत्र्याची सूचना डावलून उद्घाटन करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत या कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन उरकण्यात आलं. या उद्घाटनाला काँग्रेसचा एकही पदाधिकारी हजर नव्हता. मुख्यमंत्र्यांनी पुढील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी उद्घाटन करावं असं सांगितल होतं. शिवाय या उद्घाटनाला स्वत:हा हजर राहण्याचेही कळवलं होतं. मात्र आज मुख्यमंत्र्यांचा सुचना असतानाही उदघाटन करण्यात आले.

close