मिशन टी-20 वर्ल्डकपसाठी धोणी ब्रिगेडची झुंज !

September 20, 2012 4:02 PM0 commentsViews: 25

20 सप्टेंबर

भारताच्या मिशन टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात तर विजयानं झालीय. अफगाणिस्तानला टीम इंडिया हरवणार हे तर नक्की होतचं. पण ज्या पद्धतीनं भारतीय टीमनं विजय मिळवलाय तो बघता अजूनही धोणीच्या या टीम इंडियासमोर काही समस्या अजूनही कायम आहेत हे अगदी प्रकर्षानं जाणवतंय.

या विजयानंतर टीम इंडियानं सुटकेचा निश्वास टाकला. अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात तर केली. पण या विजयासाठी टीम इंडियाला झगडावं लागलंय हे कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला चांगलचं ठाऊक आहे.

भारताच्या टॉप बॅट्समनचा अनिश्चित फॉर्म ही अजूनही भारतीसाठी चिंतेची गोष्ट ठरली आहे. गंभीर आणि सेहवागकडून अजूनही टीमला अपेक्षित ओपनिंग मिळत नाही. तर मिडल ऑर्डरला आलेला युवराज सिंग टीमला सावराण्याचा प्रयत्न करतोय खरा पण ते प्रयत्नही अपुरेच ठरतायत. एकट्या विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर टीम इंडिया समाधानकारक स्कोर उभारतेय. पण तरीही टीम इंडियानं उभारलेल्या स्कोरवर कोहलीनं समाधान व्यक्त केलंय.

अफगाणिस्ताननं भारताच्या बॉलिंगचे कच्चे दुवे पुन्हा एकदा जगासमोर आणलेत. झहीरच्या फॉर्मवर अजूनही अनिश्चितता आहे. बालाजी विकेट जरी घेत असला तराही रन्स रोखण्यात तो अपयशी ठरतोय. पण धोणीचा 7 बॅट्समन आणि 4 स्पेशलिस्ट बॉलर घेऊन खेळण्याच्या निर्णय मात्र उपयुक्त ठरला आहे.

रविवारी भारताचा मुकाबला रंगणार आहे तो डिफेंडिंग चॅम्पियन इंग्लंडबरोबर…पण या मॅचअगोदर आपल्या कच्चा दुव्यांवर टीम इंडियाला मेहनत घ्यावी लागणार हे नक्की..

close