‘देऊळ’ ऑस्करला जाणार ?

September 18, 2012 5:04 PM0 commentsViews: 4

18 सप्टेंबर

ऑस्करसाठी भारतातून दर वर्षी सिनेमे पाठवले जातात. भाषिक चित्रपटांमध्ये देऊळ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे. ऑस्कर या सर्वोच्च समजल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी भारतातून सिनेमे पाठवले जातात. मराठी सिनेमांंमध्ये श्वास आणि नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी ऑस्करसाठी पाठवले गेले. आणि आता शक्यता आहे ती देऊळची. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ देवाच्या नावे चाललेल्या बाजारावर भाष्य करतो. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर , गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयानं देऊळ एका वेगळ्या उंचीवर पोचलाय. देऊळमधून एक वेगळं तत्त्वज्ञान मांडलं गेलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा स्वीकार होऊही शकतो. भारतातून जाणार्‍या हिंदी सिनेमांमध्येही अंतिम यादीत 9 सिनेमांची निवड झालीय. त्यातून एक ऑस्करसाठी जाईल. त्यात देऊळ असण्याची शक्यता जास्त आहे.

close