गुराखीच निघाले अट्टल घरफोडे

September 21, 2012 4:25 PM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर

नागपूरच्या कुही तालुक्यात तीन नेपाळी गुरख्यांना चोरीच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रात्री गस्त घालून घरांच संरक्षण करणारे गुरखे प्रामाणिक असतात. असा सगळ्यांचा समज आहे. मात्र या गुरख्यांनी एक-दोन नव्हे तर अनेक ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीचे पैसे आणि दागिने हे तीन ही चोरटे आपल्या गावी नेपाळला पाठवित असतं. रात्री गस्ती दरम्यान घरमालक बाहेर गेला असल्याची संधी साधून हे गुरखे आपला डाव साधतं. पोलिसांना या बाबत माहिती मिळताच कारवाई करून तीन गुरख्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 10 लाख रूपयाच्या दागिन्यासह रोख रक्कम आणि एक पिस्तुल जप्त केली आहे. या गुरख्यांनी आपला गुन्हा ही कबूल केला आहे.

close