राष्ट्रवादी यूपीएसोबतच – शरद पवार

September 21, 2012 5:07 PM0 commentsViews: 3

21 सप्टेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएसोबतच आहे आणि सरकार अस्थिर करणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज स्पष्ट केलं. मुंबईतल्या वरळीतल्या सीजी हाऊसमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, मधुकर पिचड, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे उपस्थित होते. दरवाढीबाबत फेरविचार व्हावा, असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.

close