विमा क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणूक वाढणार

September 20, 2012 5:11 PM0 commentsViews: 58

20 सप्टेंबर

विरोधक आणि मित्रपक्षांनी विरोध केला केला असला तरीही केंद्रातलं यूपीए सरकार आता मागे हटण्याच्या मनस्थितीत नाही. सुधारणांचा धडाका पुढच्या आठवड्यातही सुरू राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांतच विमा क्षेत्रातही सुधारणा आणल्या जाणार आहेत. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक 26 टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत आणली जाणार आहे. दरम्यान, रिटेल क्षेत्रातली एफडीआयची मंजुरी आजपासून लागू झाली. या सर्व निर्णयांबद्दल पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग उद्या निवेदन करणार आहे.

close