कंपन्यांना परदेशी शेअर खरेदीस 20 टक्क्यांहून 5 टक्के कर

September 21, 2012 5:12 PM0 commentsViews: 2

21 सप्टेंबर

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. स्थानिक कंपन्यांनी परदेशी शेअर खरेदी करण्यावरचा कर 20 टक्क्यांहून 5 टक्के करण्यात आला आहे. पहिल्यांदाच गुंतवणूक करणार्‍यांना चालना देण्यासाठी राजीव गांधी इक्विटी स्कीम सुरू करण्यात येणार आहे. या घोषणांमुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. बाजाराचा निर्देशांक आज गेल्या वर्षभरातल्या उच्चांकावर पोचला. सेन्सेक्स चारशे तीन अंकांनी वधारून दिवसअखेर 18 हजार 752वर स्थिर झाला. तर निफ्टीसुद्धा 136 अंकांची उसळी घेत 5 हजार 691 वर स्थिरावला.

close