‘हिरोईन’ उद्या सिनेमागृहात

September 20, 2012 5:36 PM0 commentsViews: 6

20 सप्टेंबर

सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू आहे. सिनेमा पाहायचा असेल तर दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे हिरॉइन… दिग्दर्शक मधुर भांडारकरचा हिरॉइन उद्या रिलीज होतोय. ग्लॅमरस करिना कपूरची अदाकारी प्रेक्षकांना पाहता येईल. यात सिनेमातल्या हिरॉइनचं आयुष्य उलगडलंय.वस्तूस्थितीवर आधारीत सिनेमे तयार करणं ही मधुर भांडारकर यांची खासियत..चांदणी बार, फॅशन, पेज 3 अशा सिनेमाची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यामुळे 'हिरोईन' कशी असणार याची उत्सुकता आहे. तर मराठीत 4 इडियट्स पाहता येईल. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा कॉमेडी आहे.

close