पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान वकिलाचा गोंधळ

September 22, 2012 10:06 AM0 commentsViews: 3

22 सप्टेंबर

नवी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणा दरम्यान संतोष कुमार नावाच्या 32 वर्षाच्या वकिलानं गोंधळ घातला. या तरुणानंकपडे काढून डिझेल दरवाढीचा निषेध केला. तसेच 'पंतप्रधान परत जा' च्या घोषणाही दिल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. संतोष सिंग हा लालू प्रसाद यांच्या आरजीडीच्या लीगल सेलचा कार्यकर्ता होता. संतोष सिंगच्या या निषेध नाट्यानंतर लालू प्रसाद यांनी हा लीगल सेलचं बरखास्त केला आहे.

close