मुलायम सिंगांचा केंद्राला झटका, FDIचा प्रस्ताव संसदेत आणणार ?

September 22, 2012 10:34 AM0 commentsViews: 3

22 सप्टेंबर

सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी यूपीएला पाठिंबा देऊन एकदिवस उलट नाही तोच केंद्र सरकराला धक्का देत आणखी एक गुगली टाकली आहे. एफडीआयच्या विरोधात मुलायम सिंग संसदेत प्रस्ताव आणू शकतात. आयबीएन-नेटवर्कशी बोलताना मुलायमसिंग यांनी हे संकेत दिले आहे. तसेच डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवरही मुलायम सिंग ठाम आहेत. त्यामुळे मुलायम सिंग यांनी काँग्रेसला सध्या हात दिला असला तरी हा प्रवास सुखाचा होणार नाही. असंच सध्या तरी दिसतं आहे.

close